• दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी 'जागतिक अन्न दिन (World Food Day - WFD)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • जगभरातील भूकमारीची अवस्था नष्ट करणे या मुख्य उद्देशासाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • 'निरोगी उद्यासाठी सध्या सुरक्षित अन्न (Safe food now for a healthy tomorrow)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक अन्न दिनाची' थीम आहे.

FAO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: FAO म्हणजेच Food and Agriculture Organization अर्थात अन्न व कृषी संघटना होय.

  • स्थापना वर्ष: १९४५ साली FAO ची स्थापना करण्यात आली होती.

  • संस्थेचे प्रमुख: क्यू डोंग्यू हे सध्या संस्थेच्या प्रमुख पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: रोम, इटली हे संस्थेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.