संयुक्त राष्ट्रांमार्फत दरवर्षी १६ सप्टेंबर रोजी 'ग्लोबल साउथ'साठी (प्रामुख्याने विकसनशील देशांसाठी) 'आंतरराष्ट्रीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम दिन (International Day of Science, Technology, and Innovation for the South)'साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- आर्थिक विकास तसेच शाश्वत विकासाला चालना देण्यात विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम यांची भूमिका अधोरेखित करणे हा या दिवसामागचा मुख्य उद्देश आहे.
- यंदा २०२६ साली या दिवसाची तिसरी आवृत्ती साजरी करण्यात येत आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- 'ग्रुप ऑफ ७७' (G77) आणि चीनच्या नेत्यांनी २०२३ मध्ये हवाना, क्युबा येथे आयोजित विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम परिषदेदरम्यान १६ सप्टेंबर हा दिवस 'ग्लोबल साउथ'साठी आंतरराष्ट्रीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम दिन म्हणून साजरा करण्यास सहमती दर्शविली होती.
- २०२४ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने ठराव स्वीकारत याची अधिकृतपणे घोषणा केली होती.
- १६ सप्टेंबर २०२४ रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता.