संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी १६ सप्टेंबर रोजी 'ओझोन थराच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस (International Day for the Preservation of the Ozone Layer)' म्हणजेच 'जागतिक ओझोन दिवस (World Ozone Day)' पाळण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • ओझोन थराचे महत्त्व अधोरेखित करणे तसेच त्याच्या ऱ्हासामुळे जागतिक तापमानवाढ व हवामान बदलावर होणारे परिणाम यांबाबत जागरूकता निर्माण करणे या मुख्य उद्देशासाठी संयुक्त राष्ट्रांमार्फत दरवर्षी १६ सप्टेंबर रोजी हा दिवस पाळला जातो.
  • यंदाची २०२६ सालची या दिवसाची ३२ वी आवृत्ती साजरा करण्यात येत आहे.
  • २०२६ ची संकल्पना / थीम (Theme): 'अधिक थंड पृथ्वीसाठी जागतिक कृती (Global action for a cooler planet)' ही यंदाच्या २०२६ सालच्या या दिवसाची संकल्पना आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • १९९४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमार्फत ठराव मंजूर करून १६ सप्टेंबर हा दिवस 'ओझोन थराच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस' म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती.
  • पहिल्यांदा १६ सप्टेंबर १९९५ रोजी हा दिवस पाळण्यात आला होता.