संयुक्त राष्ट्रांचा 'जागतिक अन्न दिन (World Food Day)' दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • जागतिक स्तरावर अन्न सुरक्षा, सकस आहार तसेच सुरक्षित व पौष्टिक अन्नाची उपलब्धता यांविषयी जागरूकता निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश आहे.
  • २०२६ हे वर्ष संयुक्त राष्ट्रांच्या १६ ऑक्टोबर १९४५ रोजी स्थापना झालेल्या 'अन्न आणि कृषी संघटनेच्या (Food and Agriculture Organization - FAO)' स्थापनेची ८१ वी जयंती दर्शवते.
  • २०२६ ची संकल्पना/ थीम (Theme): 'आज नाविन्य आणा, उद्याचे पोषण करा. (Innovate today. Nourish tomorrow.)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • १९७९ मध्ये इटलीमधील रोम येथे झालेल्या 'अन्न आणि कृषी संघटनेच्या' २० व्या परिषदेदरम्यान या दिवसाची सुरुवात करण्यात आली होती.
  • ५ डिसेंबर १९८० रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमार्फत ठराव स्वीकारून १६ ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक अन्न दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती.
  • 'जागतिक अन्न दिन' पहिल्यांदा १६ ऑक्टोबर १९८१ रोजी साजरा करण्यात आला होता.