'प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया (Press Council of India)' च्या अंतर्गत भारतात दरवर्षी १६ नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय प्रेस दिन (National Press Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य, नैतिक पत्रकारिता तसेच सार्वजनिक उत्तरदायित्वाला प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
- २०२६ ची संकल्पना /थीम (Theme): 'पत्रकारिता: लोकानुनयी की जबाबदार? (Journalism: Populist or Responsible)' ही या दिवसाची २०२६ सालची संकल्पना आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- १९५६ मध्ये पहिल्या प्रेस कमिशनने वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी तसेच पत्रकारितेतील व्यावसायिक मानके टिकवून ठेवण्यासाठी एक वैधानिक संस्था स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली होती.
- 'इंडियन प्रेस कौन्सिल ॲक्ट (Indian Press Council Act)', १९६५ अंतर्गत ४ जुलै १९६६ रोजी 'प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया' ची स्थापना झाली होती आणि प्रत्यक्षात तिने १६ नोव्हेंबर १९६६ पासून काम करण्यास सुरुवात केली होती.
- न्यायमूर्ती जे. आर. मुधोळकर (सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश) यांनी ४ जुलै १९६६ ते १ मार्च १९६८ या कालावधीत PCI चे पहिले अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.