दरवर्षी संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी १६ नोव्हेंबर रोजी जागतिक स्तरावर 'आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन (International Day for Tolerance)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • सांस्कृतिक विविधतेबद्दल आदर, स्वीकारार्हता आणि प्रशंसा यांना प्रोत्साहन देणे तसेच असहिष्णुता आणि भेदभावाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या (UNESCO) सदस्य राष्ट्रांनी 'सहिष्णुता तत्त्वांवरील घोषणापत्र (Declaration of Principles on Tolerance)' स्वीकारत १६ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी 'आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
  • हा दिवस पहिल्यांदा १६ नोव्हेंबर १९९६ रोजी जगभरात साजरा करण्यात आला होता.