• दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी 'आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन (International Day of Rural Women)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • ग्रामीण कुटुंब तसेच समुदायाची शाश्वतता सुनिश्चित करणे त्याचबरोबर ग्रामीण उपजीविका सुधारणे या महत्त्वपूर्ण उद्देशांसाठी हा दिवस साजरा केला जातो.

  • भारतात २०१६ सालापासून कृषी आणि महिला कल्याण मंत्रालयामार्फत सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • 'सर्वांसाठी चांगल्या अन्नाची लागवड करणाऱ्या ग्रामीण महिला' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन' थीम आहे.

  • २००८ मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता.

UN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.