नुकतेच ओमानमध्ये भारत-ओमान सागरी सराव 'नसीम अल बहर (Naseem Al Bahr) २०२६' ची १५ वी आवृत्ती संपन्न झाली आहे.
ठळक मुद्दे:
- ओमानमधील मस्कत येथे भारतीय नौदल तसेच रॉयल नेव्ही ऑफ ओमान यांच्यामध्ये 'नसीम अल बहर' हा द्विपक्षीय सागरी सराव संपन्न झाला आहे.
- सदर सराव हा ८ ते ११ नोव्हेंबर २०२६ दरम्यान पार पडला आहे.
- सदर सरावामध्ये भारतीय नौदलाची युद्धनौका 'आयएनएस सुरत (INS Surat)' ने आपला सहभाग नोंदविला होता.
- दोन्ही नौदलांमधील परस्पर कार्यक्षमता वाढवणे, कार्यात्मक अनुभवांची देवाणघेवाण करणे तसेच परस्पर सामंजस्य अधिक दृढ करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश होता.