नुकतीच टांझानियामध्ये १५३ वी आंतर-संसदीय युनियन (Inter-Parliamentary Union - IPU) सभा संपन्न झाली असून ऑस्ट्रेलियाच्या मिल्टन डिक यांची ३२ वे IPU अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • टांझानियाच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष मुसा अझान झुंगू यांच्या यजमानपदाखाली IPU ची १५३ वी सभा आयोजित करण्यात आली होती.
  • सदर परिषद ही ५ ते ९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान टांझानियातील अरुशा येथील 'अरुशा इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर' येथे पार पडली.
  • संकल्पना/ थीम (Theme): 'सर्वसमावेशकता, विश्वास आणि सर्वांसाठी संधींच्या माध्यमातून सुशासनाला बळकटी देणे आणि समुदायांचे सक्षमीकरण करणे (Enhancing good governance and empowering communities through inclusivity, trust and opportunities for all)' ही या सभेची संकल्पना होती.
  • राज्यसभा उपसभापती हरिवंश नारायण सिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संसदीय शिष्टमंडळाने या सभेत भाग घेतला होता.
  • १० ते १४ मे २०२७ दरम्यान स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे पुढील १५४ वी IPU सभा आयोजित करण्याचे नियोजित करण्यात आले आहे.