• दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी 'आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस (International Day of Rural Women)' हा जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • ग्रामीण कुटुंबे आणि समुदायांचा टिकाऊपणा सुनिश्चित करणे, ग्रामीण जीवनमान सुधारणे तसेच महिला आणि मुलींच्या महत्त्वपूर्ण भूमिकेस मान्यता देणे अशा महत्वपूर्ण उद्देशांसाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • 'कोविड-१९ च्या अनुषंगाने ग्रामीण भागातील महिलांची अनुकूलता वाढवणे (Building rural women’s resilience in the wake of COVID-19)' ही २०२० सालच्या आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवसाची थीम आहे.

  • महिलांचे संघर्ष, गरजा आणि समाजातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणे हे या दिवसाचे ध्येय आहे.

  • डिसेंबर २००७ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत सदर दिवसाची स्थापना करण्यात आली होती.

  • २००८ साली पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता.

संयुक्त राष्ट्रांबाबत (UN) महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.