भारतात दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त 'राष्ट्रीय अभियंता दिन (National Engineer’s Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- १५ सप्टेंबर रोजी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांची जयंती साजरी करण्यात येते.
- विश्वेश्वरैया यांच्या अभियांत्रिकी, राष्ट्रनिर्मिती तसेच शिक्षण क्षेत्रातील अद्वितीय योगदानाचा गौरव करण्यासाठी भारत सारकरमार्फत दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी 'राष्ट्रीय अभियंता दिन' साजरा केला जातो.
दिवसाची पार्श्वभूमी:
- भारत सरकारमार्फत १९६८ मध्ये सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांची जयंती म्हणजेच १५ सप्टेंबर हा दिवस 'राष्ट्रीय अभियंता दिन' म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.
- १५ सप्टेंबर १९६८ रोजी पहिल्यांदा 'राष्ट्रीय अभियंता दिन' साजरा करण्यात आला होता.