संयुक्त राष्ट्रांद्वारे (United Nations - UN) १५ सप्टेंबर रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन' (International Day of Democracy) पाळण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- लोकशाही मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच लोकशाही बळकटीसाठी सरकारांना प्रोत्साहित करणे या मुख्य उद्देशांसाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे १५ सप्टेंबर रोजी जगभरात हा दिवस पाळला जातो.
- 'आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाची' यंदाची २०२६ सालची १९ वी आवृत्ती साजरी करण्यात येत आहे.
- यंदाची २०२६ ची संकल्पना/थीम (Theme): 'मानवाधिकारांवर लक्ष केंद्रित करणे (Bring human rights into focus)' ही यंदाच्या या दिवसाची संकल्पना आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- 'आंतर-संसदीय संघाच्या (Inter-Parliamentary Union - IPU)' या राष्ट्रीय संसदांच्या जागतिक संघटनेच्या विनंतीवरून या दिवसाची सुरुवात करण्यात आली होती.
- इजिप्तमधील कैरो येथे झालेल्या १६१ व्या अधिवेशनादरम्यान IPU च्या सदस्य संसदांमार्फत १५ सप्टेंबर १९९७ रोजी 'लोकशाहीविषयक सार्वत्रिक घोषणा (Universal Declaration on Democracy)' स्वीकारण्यात आली होती.
- २००७ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमार्फत ठराव स्वीकारत १५ सप्टेंबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती.
- सर्वप्रथम १५ सप्टेंबर २००८ रोजी 'आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन' पाळण्यात आला होता.
UN बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्र होय.
- स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी UN ची स्थापना करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका येथे UN चे मुख्यालय स्थित आहे.
- सदस्य देश: सध्या UN चे १९३ सदस्य देश आणि व्हॅटिकन सिटी व पॅलेस्टाइन हे २ निरीक्षक देश आहेत.
- अधिकृत भाषा: UN मध्ये इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, चीनी, रशियन आणि अरबी या ६ अधिकृत भाषा आहेत.
- सध्या कार्यरत महासचिव (Secretary-General): सध्या अँटोनिओ गुटेरेस हे UN च्या महासचिव पदावर कार्यरत आहेत.