दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी 'जागतिक विद्यार्थी दिन (World Students’ Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यासाठी तसेच समाजात विद्यार्थी व शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा केला जातो.
  • यंदाचे २०२६ हे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे ९५ वे वर्ष आहे.
  • २००२ ते २००७ या कालावधीत डॉ. कलाम हे भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. 
  • ते 'मिसाईल मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जातात.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization - ISRO) आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था (Defence Research and Development Organization - DRDO) मध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.

उल्लेखनीय कार्य:

  • एसएलव्ही-३ (SLV-III) विकास - १९८०
  • पोखरण-२ अणुचाचण्या - १९९८
  • 'एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम' (Integrated Guided Missile Development Programme - IGMDP) अंतर्गत पृथ्वी आणि अग्नी क्षेपणास्त्रांची निर्मिती
  • 'टेक्नॉलॉजी व्हिजन (Technology Vision) २०२०' ला प्रोत्साहन
  • 'ग्रामीण भागांत शहरी सुविधा उपलब्ध करून देणे (Providing Urban Amenities in Rural Areas - PURA)' मॉडेल मांडणी - २००४

पुरस्कार आणि सन्मान:

  • 'पद्मभूषण' पुरस्कार - नागरी सेवा क्षेत्रातील योगदान
  • 'पद्मविभूषण' पुरस्कार (१९९०) - विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदान
  • भारतरत्न पुरस्कार (१९९७) - विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदान