'जागतिक हात धुणे दिन (Global Handwashing Day)' दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- संसर्ग रोखण्याचा एक साधा, प्रभावी आणि परवडणारा उपाय म्हणून साबण आणि पाण्याने हात धुणे याकडे पाहण्याच्या मुख्य उद्देशासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.
- २०२६ ची संकल्पना / थीम(Theme): 'हात धुण्याचे नायक बना (Be a Handwashing Hero)' ही या दिवसाची 2026 सालची संकल्पना आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- 'ग्लोबल हँडवॉशिंग पार्टनरशिपद्वारे (Global Handwashing Partnership)' मार्फत याची स्थापना करण्यात आली होती.
- ऑगस्ट २००८ मध्ये स्वीडनच्या स्टॉकहोम येथे १७-२३ ऑगस्ट या कालावधी दरम्यान आयोजित 'जागतिक जल सप्ताहा'दरम्यान या दिनाची सुरुवात करण्यात आली होती.
- पहिल्यांदा हा दिवस १५ ऑक्टोबर २००८ रोजी साजरा करण्यात आला होता.
WHO बाबत महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): WHO म्हणजेच World Health Organization अर्थात 'जागतिक आरोग्य संघटना' होय.
- स्थापना वर्ष: ७ एप्रिल १९४८ रोजी WHO ची स्थापना करण्यात आली होती.
- दिवसाचे औचित्य: ७ एप्रिल या दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी हा दिवस 'जागतिक आरोग्य दिन (World Health Day)' म्हणून साजरा करण्यात येतो.
- मुख्यालयाचे ठिकाण: जिनेव्हा, स्वित्झर्लंड (Geneva, Switzerland) येथे WHO चे मुख्यालय स्थित आहे.
- सदस्य देश: सध्या WHO चे १९४ सदस्य देश आहेत.
- सध्या कार्यरत महासंचालक: टेड्रोस अधानोम घेब्रेयसस हे सध्या WHO च्या कार्यरत महासंचालक पदावर विराजमान आहेत.