नुकतीच मुंबई, महाराष्ट्र येथे २२ ते २४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान 'इंडिया केम (India Chem)' ची १४ वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती.

ठळक मुद्दे:

  • याचे आयोजन २२ ते २४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान मुंबई, महाराष्ट्र येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, नेस्को (NESCO) येथे करण्यात आले होते.
  • 'इंडिया केम २०२६' ही रसायन आणि खते मंत्रालयाचा एक द्वैवार्षिक प्रमुख कार्यक्रम आहे.
  • 'ॲडव्हांटेज भारत: एक उदयोन्मुख जागतिक रसायन केंद्र (Advantage Bharat: An Emerging Global Chemicals Hub)' या संकल्पनेखाली ही १४ वी आवृत्ती पार पडली आहे.
  • ३ दिवस चाललेल्या या कार्यक्रमाचे आयोजन रसायन आणि खते मंत्रालयाच्या रसायन आणि पेट्रोकेमिकल्स विभागाने, 'फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री' (FICCI) च्या भागीदारीत केले होते.
  • श्री. जगत प्रकाश (जेपी) नड्डा (केंद्रीय रसायन आणि खते मंत्री) यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले.