-
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization - WHO) कार्यकारी मंडळाच्या १४८ व्या सत्राचे अध्यक्षपद भूषविले आहे.
ठळक मुद्दे
-
WHO कार्यकारी मंडळाचे १४८ वे सत्र १८ ते २६ जानेवारी २०२१ पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
-
सदर बैठकीत सर्व सदस्य देशांना एकत्र करण्यासाठी कार्यसूची निश्चित करत आरोग्याच्या उद्देशाने प्रयत्न चालू ठेवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
-
WHO मार्फत २०२१ हे वर्ष 'जागतिक एकता आणि तग धरून राहण्याचे वर्ष (Year of Global Solidarity and Survival)' म्हणून घोषित करण्यात आले आहे.
WHO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: WHO म्हणजेच World Health Organization अर्थात जागतिक आरोग्य संघटना होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड हे WHO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: ७ एप्रिल १९४८ रोजी WHO ची स्थापना करण्यात आली होती.
-
महासंचालक: टेड्रोस अडॅनॉम हे सध्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.