दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात 'हिंदी दिवस' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- देवनागरी लिपीतील हिंदी भाषेचा भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक भाषा म्हणून स्वीकार करण्याचा निर्णय संविधान सभेने १९४९ मध्ये घेतला होता.
- दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी या ऐतिहासिक महत्वाच्या निर्णयाच्या स्मरणार्थ संपूर्ण भारतात 'हिंदी दिवस' साजरा केला जातो.
- यंदाची २०२६ सालची या दिवसाची ७७ वी आवृत्ती आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींनी १९१८ च्या हिंदी साहित्य संमेलनात हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्याचा प्रस्ताव मांडला होता.
- पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५३ मध्ये १४ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी 'हिंदी दिवस' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.
- २०२६ सालच्या या दिवसाची विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथे 'हिंदी दिवस २०२६' आणि '६ व्या अखिल भारतीय राजभाषा परिषदे'च्या उद्घाटन सत्राला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संबोधित केले.