दरवर्षी १४ ऑक्टोबर रोजी 'जागतिक मानक दिन' (World Standards Day)' साजरा केला जातो.

ठळक मुद्दे: 

  • मानकीकरणाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि ऐच्छिक आंतरराष्ट्रीय मानके विकसित करण्यात योगदान देणाऱ्या तज्ज्ञांच्या कार्याचा गौरव करणे या मुख्य उद्देशांसाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.
  • २०२६ ची संकल्पना/ थीम (Theme): 'अधिक चांगल्या जगासाठी सामायिक दृष्टीकोन: शाश्वत विकास ध्येय ७ - परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा यावर विशेष लक्ष (Shared vision for a better world: Spotlight on SDG 7-Affordable and Clean Energy)' ही या दिवसाची २०२६ सालची संकल्पना आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • लंडन, युनायटेड किंगडम येथे १९४६ मध्ये २५ देशांचे प्रतिनिधी एकत्र येऊन त्यांनी मानकीकरणासाठी एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या निर्मितीबाबत चर्चा केली होती.
  • या देशांच्या पुढाकारातून १९४७ मध्ये 'आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेची (International Organization for Standardization - ISO)' ची स्थापना करण्यात आली होती.
  • १४ ऑक्टोबर १९७० रोजी पहिला 'जागतिक मानक दिन' साजरा करण्यात आला होता.
  • तत्कालीन ISO अध्यक्ष फारुक सुंटर यांनी याची सुरुवात केली होती.