संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी 'जागतिक मधुमेह दिन (World Diabetes Day)' पाळण्यात येतो. 

ठळक मुद्दे:

  • मधुमेहाबद्दल जागरूकता निर्माण करणे तसेच मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत रोखण्यावर भर देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
  • २०२६ ची संकल्पना/ थीम (Theme): 'मधुमेहावर त्वरित कृती (Early Action on Diabetes)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • जागतिक स्तरावर मधुमेहाचा वाढता जागतिक धोका लक्षात घेता १९९१ मध्ये 'आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघ (International Diabetes Federation - IDF) आणि 'जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization - WHO) यांच्या संयुक्त पुढाकाराने जागतिक मधुमेह दिनाची सुरुवात करण्यात आली होती.
  • २० डिसेंबर २००६ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेमार्फत ठराव स्वीकारून जागतिक मधुमेह दिनाला अधिकृतपणे संयुक्त राष्ट्रांचा एक विशेष दिवस म्हणून घोषित करण्यात आले.
  • पहिला जागतिक मधुमेह दिन १४ नोव्हेंबर २००७ रोजी पाळण्यात आला होता.