• संयुक्त राष्ट्रांमार्फत 'आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन (International Day for Disaster Reduction)' दरवर्षी १३ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस जोखीम-जागरूकता तसेच आपत्ती कमी करण्याच्या जागतिक संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो.

  • 'विकसनशील देशांना आपत्तीचा धोका आणि आपत्तीचे नुकसान कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य (International cooperation for developing countries to reduce their disaster risk and disaster losses)' ही २०२१ सालच्या आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिनाची थीम आहे.

  • हा दिवस १९८९ मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता.