संयुक्त राष्ट्रांचा 'आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिन (International Day for Disaster Risk Reduction)' दरवर्षी १३ ऑक्टोबर रोजी पाळला जातो.
ठळक मुद्दे:
- आपत्तींमुळे निर्माण होणाऱ्या जोखमींना रोखून त्या कमी करण्यासाठी जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
- २०२६ ची संकल्पना/ थीम (Theme): 'लवचिकतेची सुरुवात घरापासून होते (Resilience Starts at Home)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- १९८९ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेमार्फत याबाबतचा ठराव स्वीकारण्यात आला होता.
- पहिला 'नैसर्गिक आपत्ती न्यूनीकरण आंतरराष्ट्रीय दशक' दिवस १० ऑक्टोबर १९९० रोजी पाळण्यात आला होता.
- २००९ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेमार्फत ठराव स्वीकारून १३ ऑक्टोबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिन' म्हणून घोषित करण्यात आला होता.
- २०१० पासून दरवर्षी १३ ऑक्टोबर या दिवशी हा दिवस पाळला जात आहे.