जगभरात दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी 'आंतरराष्ट्रीय डाव्या हाताच्या व्यक्तींचा दिवस (International Left-Handers Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- डाव्या हाताने काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी आणि प्रामुख्याने उजव्या हाताचा वापर करणाऱ्यांच्या जगात त्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांविषयी जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे.
- डाव्या हाताने काम करणाऱ्या लोकांचे वेगळेपण, त्यांचे फायदे त्याचबरोबर त्यांना येणारी विविध आव्हाने यावर प्रकाश टाकण्यासाठी १९७६ मध्ये डीन रॉबर्ट कॅम्पबेल यांनी या दिवसाची संकल्पना मांडली होती.
- जागरूकता वाढवण्याच्या उद्देशासाठी 'द लेफ्ट-हँडर्स क्लब'ने (The Left-Handers Club) १३ ऑगस्ट १९९२ रोजी अधिकृतपणे 'आंतरराष्ट्रीय डाव्या हाताच्या व्यक्तींचा दिवस' साजरा करण्यास सुरुवात केली.