• जागतिक हत्ती दिन दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे जो जागतिक हत्तींच्या जतन आणि संरक्षणासाठी समर्पित आहे.

ठळक मुद्दे

  • थायलंडमधील कॅनेडियन चित्रपट निर्माते पॅट्रिसीया सिम्स आणि मायकेल क्लार्क यांनी जागतिक हत्ती दिनाची कल्पना मांडली होती.

  • जागतिक हत्ती दिन साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे आशियाई आणि आफ्रिकन हत्तींच्या दुर्दशेबाबत जागरूकता निर्माण करणे होय.

  • आफ्रिकन हत्तींना धोकादायक प्रजातींच्या आययूसीएन रेड लिस्ट(IUCN Red List) मध्ये 'असुरक्षित(Vulnerable)' आणि आशियाई हत्तींना 'चिंताजनक(Endangered)' म्हणून सूचीबद्ध करण्यात आले आहे.

  • २०१२ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय हत्ती दिन साजरा करण्यात आला होता.

  • जागतिक हत्ती दिन साजरा करण्याच्या निमित्ताने भारताने 'सुरक्षा (SURAKHSYA)' नावाचे राष्ट्रीय पोर्टल सुरू केले आहे. सदर पोर्टल मनुष्य आणि हत्ती यांच्यातील संघर्षाविषयी माहिती संकलित करण्याचे कार्य करते.