दरवर्षी सप्टेंबर महिन्यातील दुसऱ्या शनिवारी साजरा होणारा 'जागतिक प्रथमोपचार दिन (World First Aid Day)' यंदा १२ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे:

  • जागतिक प्रथमोपचार दिन २०२६ ची थीम/ संकल्पना: 'स्थलांतराच्या संदर्भात प्रथमोपचार (First Aid in Migration Contexts)' ही यंदाची २०२६ सालची या दिवसाची थीम आहे.
  • या संकल्पनेच्या माध्यमातून स्थलांतरित आणि विस्थापित लोकांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय मदतीची गरज या विषयावर भर देण्याचे कार्य संपन्न होते.
  • आणीबाणीच्या प्रसंगी जीव वाचवणारी मूलभूत कौशल्ये असण्याचे महत्त्व सदर दिवस अधोरेखित करतो.

मागील जागतिक प्रथमोपचार दिन आणि त्यांच्या संकल्पना (वर्ष - थीम):

  • २०२५: प्रथमोपचार आणि हवामान बदल (First Aid and Climate Change)
  • २०२४: प्रथमोपचार आणि खेळ (First Aid and Sports)
  • २०२३: डिजिटल युगातील प्रथमोपचार (First Aid in the Digital Era)

दिवसाची पार्श्वभूमी:

  • दिवसाची सुरुवात: २००० साली 'रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट सोसायट्यांची आंतरराष्ट्रीय संघटनेमार्फत (International Federation of Red Cross and Red Crescent Societies - IFRC)' या दिवसाची सुरुवात करण्यात आली होती.
  • दिवस साजरा: दरवर्षी सप्टेंबर महिन्यातील दुसऱ्या शनिवारी एका नवीन संकल्पनेसह (Theme) हा दिवस साजरा करण्यात येतो.