'जागतिक संधिवात दिन (World Arthritis Day)' दरवर्षी १२ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- संधिवाताच्या आजारांविषयी, त्यांच्या प्रतिबंध व निदानाविषयी तसेच प्रभावी उपचारांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या मुख्य उद्देशासाठी हा दिवस दरवर्षी १२ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.
- यंदाची २०२६ सालची जागतिक संधिवात दिनाची ३१ वी आवृत्ती साजरी करण्यात येत आहे.
- २०२६ ची संकल्पना/थीम (Theme): 'तुमची स्वप्ने साकार करा (Achieve Your Dreams)' ही यंदाच्या या दिवसाची २०२६ सालाची थीम आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- जागतिक संधिवात दिनाची स्थापना १९९६ मध्ये ‘आर्थरायटिस अँड र्यूमॅटिझम इंटरनॅशनलद्वारे (Arthritis and Rheumatism International - ARI)' करण्यात आली होती.
- सर्वप्रथम १२ ऑक्टोबर १९९६ रोजी हा दिवस साजरा करण्यात आला होता.