दरवर्षी १२ नोव्हेंबर रोजी 'जागतिक न्यूमोनिया दिन (World Pneumonia Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • न्यूमोनिया हा एक प्रतिबंध करण्यायोग्य तसेच उपचार करण्यायोग्य श्वसनसंस्थेचा संसर्ग आहे.
  • त्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि विशेषतः ५ वर्षांखालील मुलांमध्ये व प्रौढांमध्ये वेळेवर उपचारांना प्रोत्साहन देणे या मुख्य उद्देशांसाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.
  • २०२६ ची संकल्पना/ थीम(Theme): 'न्यूमोनिया नियंत्रणाचे एक नवीन पर्व (A New Era of Pneumonia Control)' ही या दिवसाची २०२६ सालची संकल्पना आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • सर्वप्रथम १२ नोव्हेंबर २००९ रोजी 'ग्लोबल कोएलिशन अगेन्स्ट चाइल्ड न्यूमोनिया'च्या पुढाकाराने 'जागतिक न्यूमोनिया दिन' साजरा करण्यात आला होता.
  • WHO, UNICEF आणि 'एव्हरी ब्रेथ काउंट्स कोएलिशन' न्यूमोनियामुळे होणारे मृत्यू रोखण्याच्या जागतिक प्रयत्नांना पाठिंबा देण्याचे कार्य करतात.