दरवर्षी १२ नोव्हेंबर रोजी 'सार्वजनिक प्रसारण दिवस (Public Service Broadcasting Day)' संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो. 

ठळक मुद्दे:

  • राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १९४७ मध्ये नवी दिल्ली येथे 'ऑल इंडिया रेडिओ' वरून पहिले आणि एकमेव थेट प्रसारण केले होते.
  • त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो.
  • तेंव्हाच्या 'ऑल इंडिया रेडिओ (All India Radio - AIR)' ला आता 'आकाशवाणी' म्हणून ओळखले जाते.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • भारताच्या फाळणीनंतर महात्मा गांधी यांनी नवी दिल्लीतील 'ब्रॉडकास्टिंग हाऊस' येथील 'ऑल इंडिया रेडिओ'च्या स्टुडिओला १२ नोव्हेंबर १९४७ रोजी भेट दिली होती.
  • कुरुक्षेत्र, हरियाणा येथे असलेल्या निर्वासितांच्या छावणीत राहणाऱ्या विस्थापित लोकांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी दिवाळीनिमित्त एका विशेष कार्यक्रमाद्वारे प्रसारण केले होते.
  • स्वातंत्र्यसैनिक राजकुमारी अमृत कौर देखील त्यांच्यासोबत त्याक्षणी उपस्थित होत्या.
  • २००१ मध्ये 'जन प्रसार'चे संयोजक सुहास बोरकर यांच्या पुढाकारातून १२ नोव्हेंबर हा दिवस अधिकृतपणे 'सार्वजनिक प्रसारण दिन' म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले होते.