जगभरात दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी 'जागतिक हत्ती दिन (World Elephant Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • जगातील 'सौम्य महाकाय प्राणी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हत्तींच्या संवर्धनाबाबत आणि संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे या मुख्य उद्देशाने दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी हा दिवस पाळला जातो.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • कॅनेडियन चित्रपट निर्माते पॅट्रिशिया सिम्स आणि मायकल क्लार्क (कॅनाझवेस्ट पिक्चर्स) तसेच थायलंडमधील 'एलिफंट रीइंट्रोडक्शन फाउंडेशन'चे सरचिटणीस शिवपॉर्न दरदरानंदा यांनी २०११ मध्ये 'जागतिक हत्ती दिन' ही संकल्पना पहिल्यांदा मांडली होती.
  • पहिला जागतिक हत्ती दिन १२ ऑगस्ट २०१२ रोजी पॅट्रिशिया सिम्स (Patricia Sims)आणि 'एलिफंट रीइंट्रोडक्शन फाउंडेशन (Elephant Reintroduction Foundation)' यांच्या समन्वयाद्वारे साजरा करण्यात आला होता.
  • सर्वज्ञात असणारे हत्ती हे पृथ्वीवरील जमिनीवरील सर्वात मोठे प्राणी आहेत आणि ते प्रामुख्याने त्यांची बुद्धिमत्ता, सामाजिक वर्तन व कौटुंबिक बंधांसाठी ओळखले जातात.