संयुक्त राष्ट्रांचा (United Nations - UN) 'आंतरराष्ट्रीय युवा दिन' (International Youth Day - IYD) दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी जगभरात साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • तरुणांचे योगदान अधोरेखित करणे, तरुणांशी संबंधित मुद्द्यांबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच समाजाच्या सर्व क्षेत्रांत त्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
  • 'वेगवेगळे संदर्भ, सामायिक आकांक्षा (Different Contexts, Common Aspirations)' ही या दिवसाची २०२६ सालाची थीम आहे. 

दिवसाची पार्श्वभूमी:

  • १९९१ मध्ये ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र प्रणालीच्या 'जागतिक युवा मंचाच्या (World Youth Forum)' पहिल्या अधिवेशनात आंतरराष्ट्रीय युवा दिनाची कल्पना पहिल्यांदा मांडण्यात आली होती.
  • युवा संघटनांच्या सहकार्याने 'संयुक्त राष्ट्र युवा निधीद्वारे (United Nations Youth Fund - UNYF)' निधी उभारण्याची आणि विविध उपक्रमांना चालना देण्याची शिफारस देखील या मंचाने केली होती.
  • लिस्बन येथे संयुक्त राष्ट्रांच्या सहकार्याने १९९८ मध्ये पोर्तुगाल सरकारने आयोजित केलेल्या 'युवा-विषयक मंत्र्यांच्या जागतिक परिषदे'च्या (WCMRY) पहिल्या अधिवेशनात १२ ऑगस्ट हा दिवस 'आंतरराष्ट्रीय युवा दिन' म्हणून घोषित करण्यात आला होता.
  • १२ ऑगस्ट २००० रोजी पहिला 'आंतरराष्ट्रीय युवा दिन' अधिकृतपणे साजरा करण्यात आला होता.

UN बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्र होय.
  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी UN ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका येथे UN चे मुख्यालय स्थित आहे.
  • सदस्य देश: सध्या UN चे १९३ सदस्य देश आणि व्हॅटिकन सिटी व पॅलेस्टाइन हे २ निरीक्षक देश आहेत.
  • अधिकृत भाषा: UN मध्ये इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, चीनी, रशियन आणि अरबी या अधिकृत भाषा आहेत. 
  • सध्या कार्यरत महासचिव (Secretary-General): सध्या अँटोनिओ गुटेरेस हे UN च्या महासचिव पदावर कार्यरत आहेत.