• दरवर्षी ११ ऑक्टोबर रोजी 'आंतरराष्ट्रीय बालिका दिन (International Day of the Girl Child)' जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • २०१२ सालापासून दरवर्षी ११ ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा केला जातो.

  • मुलींना भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, त्यांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या मानवी हक्कांच्या पूर्ततेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.

  • 'माझा आवाज, आमचे समान भविष्य (My voice, our equal future)' ही २०२० सालाच्या आंतरराष्ट्रीय बालिका दिनाची थीम आहे.

  • १९ डिसेंबर २०११ रोजी संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत ११ ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणून घोषित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता.

संयुक्त राष्ट्रांबाबत (UN) महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.