दरवर्षी ११ सप्टेंबर रोजी 'दक्षिण-दक्षिण सहकार्य आंतरराष्ट्रीय दिवस (International Day for South-South Cooperation)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • 'दक्षिण-दक्षिण सहकार्य आंतरराष्ट्रीय दिवस २०२६' हा "Solidarity Rising" (वाढती एकता/एकजुटीचा उदय) या संकल्पनेखाली साजरा केला जाईल.
  • यंदाची २०२६ ची थीम/संकल्पना: यंदाचा हा दिवस 'एकजुटीचा उदय: सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण विकासासाठी जागतिक आघाडी (Solidarity Rising: Global Alliance for Inclusive and Innovative Development' या संकल्पनेखाली साजरा करण्यात येत आहे.
  • ही संकल्पना सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ज्ञान आणि नाविन्यपूर्ण कल्पनांची देवाणघेवाण करण्याच्या दृष्टीने सहकार्याची गरज अधोरेखित करते.
  • याच दिवशी 'दक्षिण-दक्षिण आणि त्रिकोणी सहकार्यासाठी जागतिक आघाडी (Global Alliance for South-South and Triangular Cooperation)' या उपक्रमाची सुरुवात केली जाईल. ही बाब हा दिवस विशेष महत्त्वाचा असण्याचे आणखी एक कारण आहे.
  • देशांना त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यास सदर आघाडी मदत करेल अशी अपेक्षा आहे.

दक्षिण-दक्षिण सहकार्य - प्रमुख बाबी:

  • यशस्वी दृष्टिकोन, सखोल अनुभव तसेच विकास मॉडेल्स यात देश त्यांच्या ज्ञानाची देवाणघेवाण करतात.
  • देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध वाढल्याने आर्थिक सहकार्य निर्माण होण्यास मदत होते.
  • हवामान बदल, आरोग्यसेवा, अन्न तसेच ऊर्जा यांसारख्या समस्यांचा सामना करण्यास मदत होते.
  • स्थानिक पातळीवर विकसित करण्यात आलेले अल्प खर्चातील नाविन्यपूर्ण उपाय इतर देशांसाठीही उपयुक्त ठरू शकतात.