संयुक्त राष्ट्रांद्वारे (United Nations - UN) दरवर्षी ११ ऑक्टोबर रोजी 'आंतरराष्ट्रीय बालिका दिन (International Day of the Girl Child)' साजरा करण्यात येतो. 

ठळक मुद्दे:

  • मुलींसमोरील आव्हानांबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच त्यांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
  • २०२६ ची संकल्पना/ थीम (Theme): 'बालविवाह थांबवा आणि मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा! (End Child Marriage and Invest in Girls’ Rights!)' ही यंदाच्या या दिवसाची संकल्पना आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • २०११ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेमार्फत ठराव स्वीकारून ११ ऑक्टोबर हा 'आंतरराष्ट्रीय बालिका दिन' म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले.
  • ११ ऑक्टोबर २०१२ रोजी पहिला 'आंतरराष्ट्रीय बालिका दिन' साजरा करण्यात आला होता.
  • आंतरराष्ट्रीय बालिका दिन २०२६ च्या निमित्ताने युनिसेफ इंडियामार्फत भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना हिची 'सेलिब्रिटी ॲडव्होकेट (Celebrity Advocate)' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

UN बाबत महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्र होय.
  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी UN ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका येथे UN चे मुख्यालय स्थित आहे.
  • सदस्य देश: सध्या UN चे १९३ सदस्य देश आणि व्हॅटिकन सिटी व पॅलेस्टाइन हे २ निरीक्षक देश आहेत.
  • अधिकृत भाषा: UN मध्ये इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, चीनी, रशियन आणि अरबी या ६ अधिकृत भाषा आहेत. 
  • सध्या कार्यरत महासचिव (Secretary-General): सध्या अँटोनिओ गुटेरेस हे UN च्या महासचिव पदावर कार्यरत आहेत.