भारतात दरवर्षी ११ नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय शिक्षण दिन (National Education Day)' साजरा करण्यात येतो. 

ठळक मुद्दे:

  • स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री असणाऱ्या मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सदर दिवस साजरा केला जातो.
  • दर्जेदार शिक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून सर्वसमावेशक, न्याय्य आणि भविष्यासाठी सज्ज अशी शिक्षण प्रणाली निर्माण करणे हा दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • पूर्वीच्या मानवी संसाधन विकास मंत्रालयामार्फत (Ministry of Human Resource Development  - MHRD) जे आता 'शिक्षण मंत्रालय' (Ministry of Education - MoE) म्हणून ओळखले जाते - २००८ मध्ये या दिवसाची घोषणा करण्यात आली होती.
  • ११ नोव्हेंबर २००८ रोजी पहिला 'राष्ट्रीय शिक्षण दिन' साजरा करण्यात आला होता.