-
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) हा नुकताच 'आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा (International Solar Alliance - ISA)' १०१ वा सदस्य देश बनला आहे.
ठळक मुद्दे
-
ग्लासगो येथे COP२६ हवामान शिखर परिषदेमध्ये सदर करारावर हवामानासाठीचे अमेरिकेचे विशेष अध्यक्षीय दूत जॉन केरी यांनी औपचारिकपणे स्वाक्षरी केली आहे.
ISA बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ISA म्हणजेच International Solar Alliance अर्थात 'आंतरराष्ट्रीय सौर आघाडी' होय.
-
स्थापना वर्ष: २०१५ मध्ये ISA ची स्थापना झाली होती.
-
स्थापनेचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स येथे आंतरराष्ट्रीय सौर युतीची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: गुरुग्राम, हरियाणा हे ISA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
महासंचालक: अजय माथूर हे सध्या ISA च्या महासंचालक पदावर विराजमान आहेत.