दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी जगभरात 'जागतिक मानसिक आरोग्य दिन (World Mental Health Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच मानसिक आरोग्य जतनासाठी प्रयत्न करणे या मुख्य उद्देशांसाठी दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी जगभरात हा दिवस पाळला जातो.
  • २०२६ ची संकल्पना/ थीम (Theme): 'प्रत्यक्ष अनुभवांना वाचा: खरे आवाज, खरा बदल (Lived Experiences Heard: Real Voices, Real Change)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • 'जागतिक मानसिक आरोग्य महासंघामार्फत (World Federation for Mental Health)' तत्कालीन उप-महासचिव रिचर्ड हंटर यांच्या नेतृत्वाखाली १९९२ मध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिनाची सुरुवात करण्यात आली होती.
  • 'जागतिक आरोग्य संघटना' (World Health Organization - WHO) २०१३ पासून या जागतिक मोहिमेचे नेतृत्व करत आहे.
  • हिरवी रिबन (Green Ribbon) हे मानसिक आरोग्याबाबतची जागरूकता, आशा आणि पाठिंबा यांचे प्रतीक आहे.