दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी 'फाशीच्या शिक्षेविरुद्ध जागतिक दिवस (World Day Against Death Penalty)' पाळण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • फाशीच्या शिक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि जगभरात ती रद्द करण्याला प्रोत्साहन देणे या मुख्य उद्देशांसाठी दरवर्षी हा दिवस पाळला जातो.
  • यंदाची २०२६ सालची ही या दिवसाची २४ वी आवृत्ती साजरी करण्यात येत आहे.
  • २०२६ सालची संकल्पना /थीम(Theme): 'जीवनासाठीच्या कथा (Stories for Life)' ही यंदाच्या २०२६ सालच्या या दिवसाची संकल्पना आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • 'वर्ल्ड कोलिशन अगेन्स्ट द डेथ पेनल्टीद्वारे (World Coalition Against the Death Penalty)' या उपक्रमाला ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, संयुक्त राष्ट्र, युरोपियन युनियन तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचा पाठिंबा आहे.
  • सर्वप्रथम १० ऑक्टोबर २००३ रोजी हा दिवस पाळण्यात आला होता.