जगभरात दरवर्षी १ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान 'स्तन कर्करोग जागरूकता महिना (Breast Cancer Awareness Month)' पाळला जातो.
ठळक मुद्दे:
- स्तन कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करणे, रोगाचे लवकर निदान व वेळेवर उपचारांना प्रोत्साहन देत या आजाराने बाधित असलेल्यांना आधार देणे या मुख्य उद्देशांच्या पूर्ततेसाठी जगभरात दरवर्षी हा जागरूकता महिना पाळला जातो.
- २०२६ ची संकल्पना/ थीम (Theme): 'प्रत्येक कथा अद्वितीय आहे, प्रत्येक प्रवास महत्त्वाचा आहे. (Every story is unique, every journey matters.)' ही महिन्याची संकल्पना आहे.
दिवसाची पार्श्वभूमी
- या जागरूकता महिन्याची सुरुवात ऑक्टोबर १९८५ मध्ये 'अमेरिकन कॅन्सर सोसायटी' आणि 'इम्पीरियल केमिकल इंडस्ट्रीज'चा औषध निर्मिती विभाग यांच्यातील भागीदारीतून झाली होती.
- स्तन कर्करोगाने बाधित असलेल्या लोकांसाठी जागरूकता आणि आधार देण्यावर भर देण्यासाठी ऑक्टोबर हा महिना 'पिंक ऑक्टोबर' म्हणूनही मोठ्या प्रमाणावर ओळखला जातो