-
दरवर्षी १ डिसेंबर रोजी 'जागतिक एड्स दिन (World AIDS Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
जगभरातील लोकांना HIV विरूद्धच्या लढाईत एकत्र येण्याची, HIV ग्रस्त लोकांकरिता सहकार्य दर्शविण्याची तसेच एड्सशी संबंधित आजाराने मृत्यू पावलेल्यांचे स्मरण करण्याची संधी सदर दिवस प्रदान करतो.
-
'जागतिक एकता, सामायिक जबाबदारी (Global solidarity, shared responsibility)' ही २०२० सालच्या जागतिक एड्स दिनाची थीम आहे.
-
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे २०२० सालामध्ये संपूर्ण जगाचे लक्ष आरोग्यावर तसेच साथीच्या आजाराचा जीवनावर झालेला परिणाम यावर केंद्रित झाले आहे.