-
दरवर्षी १ डिसेंबर रोजी 'सीमा सुरक्षा दल (Border Security Force - BSF) स्थापना दिन' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
यंदाचा २०२१ सालाचा BSF चा ५७ वा स्थापना दिन आहे.
-
१ डिसेंबर १९६५ रोजी भारत-पाक आणि भारत-चीन युद्धानंतर BSF ची स्थापना करण्यात आली होती.
BSF बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: BSF म्हणजेच Border Security Force अर्थात सीमा सुरक्षा दल होय.
-
महासंचालक: पंकज कुमार सिंग हे सध्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १ डिसेंबर १९६५ रोजी BSF ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे BSF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
ब्रीदवाक्य: 'जीवन पर्यन्त कर्तव्य (Duty Unto Death)' हे BSF चे ब्रीदवाक्य आहे.