दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी जगभरात 'जागतिक शाकाहार दिन (World Vegetarian Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • शाकाहारी जीवनशैलीचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या मुख्य उद्देशासाठी दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी जगभरात हा दिवस साजरा केला जातो.
  • 'Vegetarian' हा शब्द लॅटिन शब्द 'Vegetus' पासून आला असून त्याचा अर्थ 'उत्साही' किंवा 'जोमदार' असा होतो.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे स्थित 'नॉर्थ अमेरिकन व्हेजिटेरियन सोसायटीमार्फत (North American Vegetarian Society - NAVS)' १९७७ मध्ये 'जागतिक शाकाहार दिनाची' सुरुवात केली होती.
  • १९७८ मध्ये 'इंटरनॅशनल व्हेजिटेरियन युनियन'मार्फत या दिवसाला मान्यता मिळाल्यानंतर या उपक्रमाला जागतिक स्तरावर ओळख प्राप्त झाली.
  • १ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान 'शाकाहार जागरूकता महिना' साजरा करण्यात येऊन १ नोव्हेंबर रोजी 'जागतिक व्हीगन दिना'ने (World Vegan Day)' त्याची सांगता होते.
  • 'आंतरराष्ट्रीय शाकाहार सप्ताह (International Vegetarian Week)' १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जातो.