संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन (International Day of Older Persons)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- ज्येष्ठांचे योगदान अधोरेखित करणे तसेच त्यांचे हक्क आणि प्रतिष्ठा यांबाबत जागरूकता निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
- २०२६ सालची संकल्पना/ थीम (Theme): 'दीर्घायुष्याचा काळ: अधिक दीर्घ आयुष्यासाठी प्रणालींचा पुनर्विचार (The Age of Longevity: Rethinking Systems for Longer Lives)' ही या दिवसाची २०२६ ची संकल्पना आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- १९८२ साली 'वृद्धत्वावरील जागतिक परिषदेपासून (World Assembly on Ageing)' या दिवसाच्या पालनाची सुरुवात झाली होती.
- १४ डिसेंबर १९९० रोजी संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत ठराव स्वीकारून १ ऑक्टोबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन' म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
- सर्वप्रथम १ ऑक्टोबर १९९१ रोजी आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन साजरा करण्यात आला होता.
UN बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्र होय.
- स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी UN ची स्थापना करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका येथे UN चे मुख्यालय स्थित आहे.
- सदस्य देश: सध्या UN चे १९३ सदस्य देश आणि व्हॅटिकन सिटी व पॅलेस्टाइन हे २ निरीक्षक देश आहेत.
- अधिकृत भाषा: UN मध्ये इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, चीनी, रशियन आणि अरबी या ६ अधिकृत भाषा आहेत.
- सध्या कार्यरत महासचिव (Secretary-General): सध्या अँटोनिओ गुटेरेस हे UN च्या महासचिव पदावर कार्यरत आहेत.