दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी 'आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस (International Coffee Day)' जगभरात साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- कॉफीचा उत्सव साजरा करणे तसेच कॉफीच्या मूल्य साखळीत सहभागी असलेल्या समुदायांचे योगदान अधोरेखित करणे तसेच जागतिक कॉफी क्षेत्राला शाश्वत बनवण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
- संयुक्त राष्ट्र महासभेतर्फे मान्यता दिल्यानंतर १ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिकृतपणे पहिला आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस साजरा करण्यात आला आहे.
- २०२६ सालची संकल्पना/ थीम (Theme): 'कॉफीचा उत्सव: प्रत्येक कपमागील लोकांचा सन्मान (Celebrating Coffee, Honouring the People Behind Every Cup)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- कॉफीचा उत्सव साजरा करण्यासाठी मार्च २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय कॉफी संघटनेच्या सदस्य देशांनी दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस आयोजित करण्यास सहमती दर्शवत एक सामायिक जागतिक दिवस निश्चित केला होता.
- १ ऑक्टोबर २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस साजरा करण्यात आला होता.
- १ ऑक्टोबर २०२६ रोजी 'अन्न आणि कृषी संघटनेने' रोम, इटली येथील आपल्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय कॉफी दिवसाचा पहिला अधिकृत कार्यक्रम आयोजित केला होता.