दरवर्षी १ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान 'पठन अक्षमता/डिस्लेक्सिया जागरूकता महिना (Dyslexia Awareness Month)' जगभरात पाळण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • डिस्लेक्सियाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या महिन्याचा मुख्य उद्देश आहे. 
  • डिस्लेक्सिया ही शिकण्याबाबत संबंधित अशी सामान्य असणारी परंतु अनेकदा चुकीच्या पद्धतीने समजली जाणारी स्थिती आहे.
  • सुपरिचित असा 'जागतिक डिस्लेक्सिया दिन' अथवा 'जागतिक डिस्लेक्सिया जागरूकता दिन' दरवर्षी ८ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. 
  • ऑक्टोबर महिन्यातील पहिला पूर्ण आठवडा 'डिस्लेक्सिया जागरूकता सप्ताह' पाळला जातो.
  • यंदाचा २०२६ सालचा हा आठवडा ५ ते ११ ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • हा दिवस पहिल्यांदा २०१३ मध्ये साजरा करण्यात आला ज्याची सुरुवात 'युरोपियन डिस्लेक्सिया असोसिएशनमार्फत (European Dyslexia Association - EDA)' करण्यात आली होती.
  • 'इंटरनॅशनल डिस्लेक्सिया असोसिएशन (International Dyslexia Association)' ही जागतिक स्तरावर डिस्लेक्सियाबद्दल जागरूकता तसेच समज वाढवण्याचे महत्वपूर्ण कार्य करते.