राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत (National Statistical Office - NSO) नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादवाढीचा (Gross Domestic Product - GDP) दर ७.८% इतका राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे:
- सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत (Ministry of Statistics and Program Implementation - MoSPI) येणाऱ्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीचे सकल देशांतर्गत उत्पादनाचे (GDP) त्रैमासिक अंदाज जाहीर केले आहेत.
- NSO च्या आकडेवारीनुसार हा दर Q1FY26 मध्ये नोंदवलेल्या ६.९% वाढीपेक्षा अधिक आहे.
NSO बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): NSO म्हणजेच National Statistical Office अर्थात राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय होय.
- स्थापना वर्ष: CSO आणि NSSO चे विलीनीकरण करून मे २०१९ मध्ये NSO ची स्थापना करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे NSO चे मुख्यालय स्थित आहे.