यूनेस्कोमार्फत (UNESCO) दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन' (International Literacy Day - ILD) साजरा केला जातो.
ठळक मुद्दे:
- व्यक्तींचे सक्षमीकरण आणि समुदाय व समाजाच्या विकासाला चालना देण्यात साक्षरतेची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करणे या उद्देशासाठी यूनेस्कोतर्फे दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो.
- युनेस्कोने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाची घोषणा १९६६ मध्ये केली होती.
- यंदाचे २०२६ हे वर्ष त्या घोषणेचा ६० वा वर्धापन दिन आहे.
- २०२६ सालची थीम/संकल्पना: 'लोक, पृथ्वी आणि समृद्धीसाठी साक्षरता (Literacy for people, the planet, and prosperity)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन - दिवसाची पार्श्वभूमी:
- सर्वप्रथम १९६५ मध्ये इराणमधील तेहरान येथे आयोजित 'निरक्षरता निर्मूलनासाठी शिक्षण मंत्र्यांच्या पहिल्या जागतिक परिषदे'त आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्याची कल्पना मांडण्यात आली होती.
- सदर परिषदेमार्फत परिषदेचा उद्घाटन दिवस - ८ सप्टेंबर - हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून निश्चित करण्याची घोषणा करण्यात आली.
- फ्रान्समधील पॅरिस येथे १९६६ मध्ये झालेल्या युनेस्कोच्या महासभेच्या १४ व्या अधिवेशनात ८ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी 'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन' म्हणून साजरा करण्याचे अधिकृतपणे घोषित करण्यात आले होते.
- ८ सप्टेंबर १९६७ रोजी 'पहिला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन' साजरा करण्यात आला होता.
UNESCO बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना होय.
- स्थापना वर्ष: १६ नोव्हेंबर १९४५ रोजी UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स येथे UNESCO चे मुख्यालय स्थित आहे.
- सदस्य देश: सध्या UNESCO चे १९४ सदस्य आणि १२ सहयोगी सदस्य देश आहेत.
- सध्या कार्यरत महासंचालक: खालेद एल-एनी हे सध्या UNESCO च्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.