दरवर्षी १७ ऑक्टोबर रोजी जगभरात संयुक्त राष्ट्रांचा 'आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन (International Day for the Eradication of Poverty)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- गरिबीबद्दल जागरूकता निर्माण करणे, मानवी प्रतिष्ठा व मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे तसेच गरिबीच्या सर्व प्रकारांचे उच्चाटन करण्यासाठी जागतिक प्रयत्नांना चालना देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
- यंदाची २०२६ सालची या दिवसाची ३४ वी आवृत्ती आहे.
- २०२६–२०२८ ची संकल्पना / थीम (Theme): 'शांतता आणि मानवी हक्कांसाठी एकत्र (United for Peace and Human Rights)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- फ्रान्समधील पॅरिस येथील 'ट्रोकाडेरो प्लाझा' येथे १९८७ रोजी १,००,००० हून अधिक लोक एकत्र आले होते.
- अत्यंत गरिबी, भूक आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या लोकांच्या स्मृतीस अभिवादन करत त्यांनी गरिबीला मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचे मान्य केले होते.
- २२ डिसेंबर १९९२ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेमार्फत ठराव स्वीकारून १७ ऑक्टोबर हा दिवस अधिकृतपणे 'आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन' म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले होते.
- पहिला 'आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन' १७ ऑक्टोबर १९९३ रोजी साजरा करण्यात आला होता.