संयुक्त राष्ट्रांद्वारे दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी 'आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन (International Day of Rural Women)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- ग्रामीण विकासामध्ये ग्रामीण व स्थानिक महिलांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
- २०२६ ची संकल्पना /थीम (Theme): 'ग्रामीण महिला शेतकरी: निसर्गमातेची जपणूक करणाऱ्या (Rural Women Farmers Caring for Mother Nature)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- १९९५ मध्ये चीनमधील बीजिंग येथे झालेल्या महिलांवरील चौथ्या जागतिक परिषदेदरम्यान ही संकल्पना मांडण्यात आली होती.
- संयुक्त राष्ट्र महासभेमार्फत २००७ मध्ये हा ठराव स्वीकारून १५ ऑक्टोबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन' म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
- १५ ऑक्टोबर २००८ रोजी हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता.