वर्षातून दोनदा (मे आणि ऑक्टोबर महिन्यांतील दुसऱ्या शनिवारी) पाळण्यात येणारा 'जागतिक स्थलांतरित पक्षी दिन (World Migratory Bird Day)' ऑक्टोबर महिन्यात १० ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे:

  • हा जागतिक दिवस म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या पाठिंब्याने राबवली जाणारी एक जागतिक मोहीम आहे. 
  • स्थलांतरित पक्ष्यांसमोरील आव्हानांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनासाठीच्या कृतीस प्रोत्साहित करणे या मुख्य उद्देशांसाठी हा दिवस वर्षातून दोनदा - मे आणि ऑक्टोबर महिन्यांतील दुसऱ्या शनिवारी - पाळला जातो.
  • यंदा २०२६ मध्ये ९ मे २०२६ आणि १० ऑक्टोबर २०२६ रोजी 'जागतिक स्थलांतरित पक्षी दिन साजरा करण्यात येत आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • १९९३ मध्ये या उपक्रमाची सुरुवात सुरुवातीला अमेरिकेत 'आंतरराष्ट्रीय स्थलांतरित पक्षी दिन' म्हणून झाली होती.
  • वॉशिंग्टन, डी.सी. (अमेरिका) येथील 'स्मिथसोनियन मायग्रेटरी बर्ड सेंटर'ने याची स्थापना केली होती.
  • पहिला अधिकृत 'जागतिक स्थलांतरित पक्षी दिन' ८-९ एप्रिल २००६ रोजी केनियामधील लाइकिपिया येथील 'ओल आरी न्यिरो' वन्यजीव राखीव क्षेत्रात साजरा करण्यात आला होता. 
  • संवर्धनवादी कुकी गॅलमॅन यांनी याचे यजमानपद भूषवले होते.