Current Affairs Marathi | मराठी चालू घडामोडी | Chalu Ghadamodi Marathi महत्त्व आणि संपूर्ण अभ्यास भाग – २

26 Aug 2026 admin@mycurrentaffairs.com

नमस्कार मित्रहो ..!!


आपण स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी या विभागाचा अभ्यास कसा करावा हे पाहत आहोत. मागील लेखामध्ये आपण बेसिक माहिती घेतली. आता आपण या लेखामध्ये अजून सविस्तर माहिती घेणार आहोत.


Daily Best Current Affairs in Marathi | मराठी चालू घडामोडी | Chalu Ghadamodi Marathi  महत्त्व आणि संपूर्ण अभ्यास 


तर आता आपण पाहूया की मराठी चालू घडामोडींचा (Current Affairs Marathi) अभ्यास कोणत्या २० प्रमुख विभागांमध्ये करावा? जेणेकरून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला Best Marathi Current Affairs ची तयारी अधिक सोपी जाईल.


स्पर्धा परीक्षांसाठी याचे व्यवस्थित वर्गीकरण केल्यास अभ्यास अधिक सोपा होतो आणि चांगले गुण मिळण्याची शक्यता बळावते.


 

१. चर्चेतील व्यक्तिमत्वे – निधन वार्ता


परीक्षांच्या माध्यमातून प्रसिद्ध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, कलाकार, शास्त्रज्ञ, खेळाडू, पर्यावरणवादी किंवा इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या निधनाच्या बातम्या अत्यंत महत्वाच्या आहेत. या संबंधित सखोल माहिती घेण्यासाठी खालील सूत्राचा अवलंब केल्यास अधिक चांगला अभ्यास होतो हे निदर्शनास आले आहे.


व्यक्ती --> क्षेत्र --> प्रमुख कार्य --> पुरस्कार --> संबंधित संस्था हे लक्षात ठेवा.

 


२. क्रीडा विश्व


हा देखील स्पर्धा परीक्षांमधील अतिशय महत्वपूर्ण विभाग आहे. क्रीडा घडामोडींमध्ये खालील बाबींचा समावेश होतो. त्यांचा सखोल अभ्यास करावा:


  • स्पर्धेचे नाव आणि ठिकाण


  • विजेता


  • उपविजेता


  • यजमान देश / राज्य / इतर ठिकाण


  • खेळाडूचा विशेष / उल्लेखनीय विक्रम / कामगिरी 


  • मिळवलेली पदके


  • पुरस्काराबाबत माहिती तसेच त्याचे ऐतिहासिक महत्व


  • क्रीडा संघटना आणि त्या संबंधित महत्वाच्या ऐतिहासिक बाबी


 

३. बँकिंग, आर्थिक व वित्तीय घडामोडी


हा विभाग MPSC तसेच विशेषतः Banking Exams साठी अतिशय महत्त्वाचा आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे अभ्यास केल्यास या विभागाची तयारी सोपी होऊन जाईल.


यातील अभ्यासाचे प्रमुख विषय:


  • RBI आणि संबंधित निर्णय/ घोषणा / धोरणे


  • रेपो दर – संकल्पना आणि चालू आकडेवारी


  • महागाईबाबत महत्वाचे मुद्दे आणि आकडेवारी


  • GDP


  • बँकिंगविषयक बाबी


  • वित्तीय धोरण घोषणा


  • अर्थसंकल्प घोषणा – केंद्र, राज्य


  • आर्थिक सर्वेक्षण 


  • SEBI निर्णय, मान्यता


  • UPI, डिजिटल पेमेंटविषयक नवीन बाबी किंवा घोषणा


  • विमा


  • भांडवली बाजार व इतर घडामोडी


 

४. राष्ट्रीय घडामोडी


यामध्ये मुख्यतः राष्ट्रीय स्तरावर अर्थात भारतामधील महत्त्वाच्या घटनांचा समावेश होतो:


  • केंद्र सरकारचे लक्षवेधी निर्णय


  • जाहीर होणाऱ्या नवीन योजना


  • कायदे आणि तरतुदी आणि दुरुस्त्या


  • राष्ट्रीय मोहिमा


  • पायाभूत सोयी आणि सुविधा


  • सामाजिक क्षेत्र – वेचक बाबी


  • शिक्षण – योजना, धोरणे आणि व्यापकता


  • आरोग्य – धोरणे, योजना आणि प्रकल्प


  • प्रशासनविषयक महत्वपूर्ण निर्णय

 

५. घटनात्मक व राजकीय घडामोडी


या विभागामध्ये Marathi Current Affairs ना संविधानाशी जोडणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यामुळे नुलनात्मक आणि आकलनात्मक अभ्यास होतो.


उदा.:


  • राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती


  • संसद


  • सर्वोच्च आणि उच्च न्यायालय


  • राज्यपाल आणि मुख्यमंत्री


  • निवडणूक आयोग – तरतुदी, घोषणा आणि दुरुस्त्या


  • घटनादुरुस्ती – संबंधित कलम, नवीन बदल


  • केंद्र-राज्य संबंध


या विभागासाठी एखादी बातमी वाचताना स्वतःला एक प्रश्न विचारा की ‘यामागे संविधानातील कोणती तरतूद आहे? किंवा याचा संविधानाशी कसा संबंध जोडला जाऊ शकतो..?



६. बैठका, संमेलने आणि परिषदा


राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भारताचा सहभाग, प्रमुख निर्णय, यजमान देश आणि संबंधित संघटना यांचा या विभागात सविस्तर अभ्यास करावा.


विशेषतः:

  • G20


  • BRICS


  • SCO


  • ASEAN


  • UN, UNESCO


  • हवामान परिषद


  • आर्थिक परिषद


  • संरक्षण परिषद


 

७. नियुक्त्या, नेमणुका आणि राजीनामे


आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावर महत्त्वाच्या व्यक्तींच्या नियुक्त्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. यासाठी खालील सूत्रानुसार नोंद ठेवा.


व्यक्ती --> पद --> संस्था --> नियुक्तीची तारीख


 

८. दिनविशेष आणि महत्त्वाच्या घटना


महत्त्वाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिवस, त्यांच्या थीम आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी यांचा या विभागात अभ्यास करा.


उदा.:

  • जागतिक पर्यावरण दिन


  • जागतिक आरोग्य दिन


  • राष्ट्रीय विज्ञान दिन


  • आंतरराष्ट्रीय योग दिन


  • संविधान दिन

 

९. पुरस्कार, सन्मान आणि पुस्तके


यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावरील प्रसिद्ध लेखक, कवी किंवा साहित्यिक यांच्या पुरस्कार, सन्मान आणि पुस्तकांचा समावेश होतो:


  • राष्ट्रीय पुरस्कार


  • आंतरराष्ट्रीय पुरस्कार


  • साहित्यिक पुरस्कार


  • क्रीडा पुरस्कार


  • नागरी पुरस्कार


  • वैज्ञानिक पुरस्कार


  • महत्त्वाची पुस्तके


  • प्रसिद्ध लेखक, साहित्यिक


 

१०. आंतरराष्ट्रीय घडामोडी


या विभागात खालील घटकांचा अभ्यास करावा. या दरम्यान विचारावयाचा महत्त्वाचा प्रश्न: ‘या आंतरराष्ट्रीय घटनेचा भारताशी काय संबंध आहे? किंवा या घटनेचा भारतावर काय परिणाम होतो?’


  • भारताचे परराष्ट्र संबंध


  • UN


  • IMF


  • World Bank


  • WHO


  • WTO


  • G20


  • BRICS


  • SCO


  • आंतरराष्ट्रीय करार


  • जागतिक संघर्ष


 

११. विकास योजना, अभियान आणि प्रकल्प


सरकारी (केंद्र + राज्य) योजनांचा अभ्यास करत असताना फक्त त्या योजनांची नावे पाठ करू नका.


प्रत्येक योजनेसाठी खालील पद्धतीनुसार माहिती तयार करा. उजळणी करताना याचा खूप फायदा होतो.


योजना --> सुरुवात --> मंत्रालय --> उद्देश --> लाभार्थी --> निधी --> प्रमुख वैशिष्ट्य

 


१२. चर्चेतील व्यक्तिमत्वे – विशेष कामगिरी


एखाद्या व्यक्तीने राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष कामगिरी केली असल्यास ती विशेष बातमी बनते आणि आपल्याला अभ्यासासाठी महत्वपूर्ण ठरते.


उदा.:


  • उल्लेखनीय विक्रम


  • विशेष पुरस्कार


  • प्रसिद्ध वैज्ञानिक शोध


  • सामाजिक कार्य


  • क्रीडा कामगिरी


  • आंतरराष्ट्रीय सन्मान


 

१३. अहवाल, निर्देशांक आणि क्रमवारी


हा विभाग विशेषतः MPSC तसेच Banking साठी महत्त्वाचा आहे.


प्रत्येक अहवालासाठी खालीलप्रमाणे माहिती तयार करा.


अहवालाचे नाव → प्रकाशित करणारी संस्था→उद्देश→भारताची क्रमवारी→क्रमवारीतील  सर्वोच्च क्रमांकावरील देश -->  क्रमवारीतील तळाचे देश


 

१४. संरक्षण आणि अवकाश तंत्रज्ञान


यामध्ये खालील बाबींचा अभ्यास करावा.:


  • इस्रो (ISRO)


  • DRDO


  • उपग्रह – प्रक्षेपण ठिकाण आणि इतर महत्वपूर्ण बाबी


  • अंतराळ मोहिमा


  • क्षेपणास्त्रे


  • लष्करी सराव


  • संरक्षण करार


  • नवीन संरक्षण तंत्रज्ञान


 

१५. समित्या, आयोग आणि करार


प्रत्येक समितीसाठी खालील मुद्यांचा अभ्यास करा:


  • नाव


  • अध्यक्ष


  • स्थापना


  • उद्देश


  • प्रमुख शिफारसी


 

१६. चर्चेतील ठिकाणे


Current Affairs मध्ये चर्चेत आलेल्या खालील घटकांचा नकाशाशी संबंध जोडून अभ्यास करा म्हणजे अभ्यास सोपा होऊन लक्षात राहण्यास फायदा होतो:


  • शहर


  • गाव


  • जिल्हा


  • राज्य


  • देश


  • पर्वत


  • नदी


  • समुद्र


  • वनक्षेत्र


 

१७. भूगोल आणि पर्यावरण


यामध्ये अंतर्भूत होणाऱ्या बाबी खालीलप्रमाणे:


  • हवामान बदल


  • जैवविविधता


  • राष्ट्रीय उद्याने


  • व्याघ्र प्रकल्प


  • रामसर ठिकाणे (Ramsar Sites)


  • नद्या, उपनद्या आणि प्रवाह


  • जंगल


  • प्रदूषण


  • नैसर्गिक आपत्ती


 

१८. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडी


यामध्ये खालील बाबी समाविष्ट होतात. त्यांचा सविस्तर अभ्यास अंतिम परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो:


  • महिला सक्षमीकरण


  • सामाजिक न्याय


  • आदिवासी विकास


  • शिक्षण


  • भाषा


  • साहित्य


  • कला


  • संस्कृती


  • वारसा


  • लोककला


 

१९. विज्ञान आणि तंत्रज्ञान


आजच्या काळात Science & Technology हा Current Affairs चा महत्त्वाचा भाग आहे.


यातील अभ्यासाचे महत्वाचे विषय:


  • कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence)


  • जैवतंत्रज्ञान (Biotechnology)


  • क्वांटम तंत्रज्ञान (Quantum Technology)


  • अर्धवाहक (Semiconductors)


  • रोबोटिक्स (Robotics)


  • सायबर सुरक्षा (Cyber Security)


  • अंतराळ तंत्रज्ञान (Space Technology)


  • नॅनोतंत्रज्ञान (Nanotechnology)


  • वैद्यकीय तंत्रज्ञान (Medical Technology)


  • नवीन शोध आणि संशोधन

 

२०. महाराष्ट्र राज्य चालू घडामोडी


MPSC आणि महाराष्ट्रातील इतर सरकारी भरती परीक्षांसाठी हा विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.


यामध्ये खालील प्रमुख घटकांचा अभ्यास करावा:


  • महाराष्ट्र शासनाचे निर्णय


  • मंत्रिमंडळ निर्णय


  • नवीन सरकारी योजना


  • महाराष्ट्रातील नियुक्त्या


  • जिल्हानिहाय घटना


  • कृषी


  • सहकार


  • उद्योग


  • गुंतवणूक


  • शिक्षण


  • आरोग्य


  • महिला व बालविकास


  • पर्यावरण


  • वन्यजीव


  • पायाभूत सुविधा


  • सामाजिक विकास


  • क्रीडा


  • पुरस्कार


  • सांस्कृतिक घटना