Current Affairs Marathi | मराठी चालू घडामोडी | Chalu Ghadamodi Marathi महत्त्व आणि संपूर्ण अभ्यास भाग - १

25 Aug 2026 admin@mycurrentaffairs.com

नमस्कार मित्रहो....!!!


Daily Best Current Affairs in Marathi | मराठी चालू घडामोडी | Chalu Ghadamodi Marathi महत्त्व आणि त्यांचा संपूर्ण अभ्यास कसा करावा?


आजचे युग हे स्पर्धेचे युग मानले जाते. प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रचंड अटीतटीच्या स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. काहीही करून यशस्वी होण्यासाठी सुरू असलेल्या या बिकट मार्गात स्पर्धा ही अनिवार्य आणि अतिशय अविभाज्य घटक बनली आहे. अधिकारी होण्याचे ध्येय उराशी बाळगणारी आजची पिढी या स्पर्धेच्या गर्तेत अडकली आहे. यात आढळणाऱ्या काही महत्वाच्या परीक्षांमध्ये येणाऱ्या परीक्षा म्हणजे - MPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य विभाग भरती, महसूल विभाग भरती, बँकिंग व इतर सरकारी भरती होय.


निश्चित ध्येय आखणी, योग्य मार्गदर्शन, उचित दिशेने मार्गक्रमण या आणि यांसारख्या अनेक बाबींमध्ये जाणवणारी उणीव त्यांच्या अधिकारी पदाच्या प्रवासात मोठा अडथळा बनून राहिली आहे. अशा असंख्य होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या प्रामाणिक हेतूने आम्ही, 'MyCurrentAffairs.com' ने हा उपक्रम सुरू केला आहे. बाजारात उपलब्ध संदर्भ साहित्यामधून निवडक आणि वेचक साहित्याचा अभ्यास आणि मुख्यतः सराव करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र अजूनही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये खूप संभ्रम आहे. अशा असंख्य विद्यार्थ्यांना आम्ही सुरू केलेल्या या उपक्रमाद्वारे योग्य वाटचाल करण्यासाठी निश्चित दिशा मिळेल याची आम्हाला खात्री आहे.


असं म्हणतात की स्पर्धेच्या वाऱ्यात टिकायचं असेल तर वाऱ्याशी स्पर्धा करावी लागते. तसंच काहीसं स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांच्या जगातही दिसत आहे. आज महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक घरामध्ये एकतरी विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करताना आढळत आहे. यामध्ये अनेक विषय अंतर्भूत आहेत. मराठी चालू घडामोडी (Marathi Current Affairs) हा त्यापैकीच एक विषय.


स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमामध्ये चालू घडामोडी (Current Affairs) हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. MPSC असो, पोलीस भरती असो, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य विभाग भरती, महसूल विभाग भरती, बँकिंग भरती किंवा इतर कोणतीही सरकारी नोकरीची स्पर्धा परीक्षा असो—उमेदवाराच्या सर्वांगीण आणि समग्र ज्ञानाची चाचपणी तसेच आजूबाजूच्या घडामोडी समजून घेण्याच्या क्षमतेची चाचणी घेण्यासाठी Current Affairs चा उपयोग केला जातो.


विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अधिकृत उपलब्ध अभ्यासक्रम + मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी यांचा एकत्रित अभ्यास करणे अधिक प्रभावी ठरते हे विविध उपक्रमांमधून व संशोधनातून प्रकर्षाने दिसून आले आहे.


परंतु स्पर्धा परीक्षा मराठी चालू घडामोडी (Marathi Current Affairs) म्हणजे केवळ रोज वर्तमानपत्र वाचणे किंवा बातम्या पाठ करणे इतकंच मर्यादित किंवा अपेक्षित नाही. तर


चालू घडामोडींचा खरा अभ्यास म्हणजे — ती संपूर्ण घटना नीट समजून घेणे, तिची एकंदरीत पार्श्वभूमी जाणून घेणे, तिच्याशी संबंधित भौगोलिक, ऐतिहासिक किंवा इतर कोणत्या प्रकारचा संबंध आपण करत असलेल्या अभ्यासातील घटकांशी अर्थात Static GK शी जोडता येईल ते शोधणे, परीक्षेमध्ये विचारले जातील असे संभाव्य प्रश्न ओळखणे, त्याच्या परिणामांचे विश्लेषण करणे आणि योग्य वेळी, योग्य प्रकारे उजळणी (Revision) करणे.


चालू घडामोडी मराठी (Current Affairs Marathi) म्हणजे नेमके काय?


Current Affairs म्हणजे वेगळं काही नसून अलीकडच्या काळात किंवा दररोज आपल्या देशात, राज्यात आणि जगभरात घडलेल्या महत्त्वाच्या राजकीय (Political), आर्थिक(Economic), सामाजिक(Social), वैज्ञानिक(Scientific), पर्यावरणीय(Environmental), क्रीडा(Sports), सांस्कृतिक(Cultural) आणि प्रशासकीय (Administrative) घटनांचा अभ्यास करणे होय. खालील बाबींचा यामध्ये समावेश होतो.


उदाहरणार्थ:


  • केंद्र सरकारमार्फत घेतलेला नवीन निर्णय


  • महाराष्ट्र सरकारतर्फे अंमलात आणलेली नवीन योजना


  • नवीन कायदा किंवा घटनात्मक बदल


  • महत्वाच्या पदांवरील नियुक्त्या


  • राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार


  • क्रीडा स्पर्धेतील विजेते


  • नवीन वैज्ञानिक शोध


  • अंतराळ मोहीम आणि त्यासंबंधित बाबी


  • आर्थिक धोरणातील विशेष बदल


  • RBI चे विविध निर्णय


  • नवीन जाहीर होणारे निर्देशांक आणि अहवाल


  • पर्यावरणाशी संबंधित महत्त्वाच्या घटना आणि त्यांचे परिणाम


  • आंतरराष्ट्रीय परिषदा आणि बैठका


  • भारताचा एखाद्या देशासोबतचा करार किंवा युद्ध सराव


  • महाराष्ट्रातील नवीन प्रकल्प/योजना 



स्पर्धा परीक्षांमध्ये Current Affairs Marathi हा विषय इतका महत्त्वाचा का आहे?


कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त पाठांतराची परीक्षा नाही. एक सक्षम सरकारी अधिकारी, कर्मचारी किंवा प्रशासकीय प्रतिनिधी या नात्याने उमेदवाराला आपल्या देशात, राज्यात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडत आहे याची जाणीव असणे अतिशय आवश्यक आहे.


मराठीतील चालू घडामोडींचा अभ्यास उमेदवाराला ४ महत्त्वाच्या गोष्टी प्रदान करतो:


१. अद्ययावत सामान्यज्ञान (Up-to-date General Knowledge): देश, राज्य आणि जगातील महत्त्वाच्या घटनांची माहिती मिळते.


२. Static GK मजबूतीकरण (Static GK Strengthening): काही गोष्टी link होत असल्यामुळे चालू घडामोडींच्या अभ्यासाच्या माध्यमातून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थव्यवस्था, विज्ञान आणि पर्यावरण यांसारख्या विषयांचा पुन्हा उजाळणीवजा अभ्यास होतो.


३. विश्लेषणात्मक क्षमता दृढीकरण (Analytical capacity strengthening): वाचनात येणारी एखादी घटना का घडली, तिचे परिणाम काय असतील तसेच त्या बाबीसंदर्भात सरकारसमोर कोणती आव्हाने आहेत याचा विचार करण्याची सवय लागते.


४. प्रश्न सोडवण्याची क्षमता वाढते (Problem-solving ability improvement): या अभ्यासामुळे Current Affairs वर आधारित तथ्यात्मक, संकल्पनात्मक आणि विश्लेषणात्मक प्रश्न सोडवणे सोपे जाते.


चालू घडामोडी कोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत?


Current Affairs चा अभ्यास हा केवळ MPSC पुरता मर्यादित नाही. त्याचा आवाका खूप मोठा झाला आहे. इतर स्पर्धा परीक्षांमध्ये देखील या घटकांचे महत्व तितकेच अनन्यसाधारण झाले आहे. आता आपण थोडक्यात कोणत्या परीक्षांमध्ये कशाचा समावेश होतो ते पाहूया.


१. MPSC राज्यसेवा (MPSC Rajysewa / State Service)


MPSC राज्यसेवेच्या विविध परीक्षांमध्ये चालू घडामोडींचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. मुख्यतः यामध्ये महाराष्ट्र-केंद्रित तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.


MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर विविध परीक्षांचे अभ्यासक्रम, परीक्षा योजना आणि मागील प्रश्नपत्रिका इ. सर्व काही उपलब्ध असल्यामुळे उमेदवारांनी त्यांचा अभ्यास करून Current Affairs च्या अभ्यासाची दिशा निश्चित करावी.


२. पोलीस भरती (Police Bharti)


पोलीस भरतीच्या तयारीमध्ये सामान्यज्ञान, विशेषतः महाराष्ट्राबाबतची माहिती, राष्ट्रीय घडामोडी, क्रीडा, पुरस्कार, महत्त्वाचे दिवस आणि इतर चालू घटनांचा अभ्यास अतिशय उपयुक्त ठरतो.


३. तलाठी भरती (Talathi Bharti)


तलाठी पदासाठी खास करून महाराष्ट्र-केंद्रित चालू घडामोडींना विशेष महत्त्व आहे. यामध्ये खालील मुख्य केंद्रित घटक अभ्यास करणे फायदेशीर ठरते.


  • महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना


  • महसूल प्रशासन आणि कार्ये


  • जिल्हानिहाय महत्वपूर्ण घटना


  • कृषी आणि ग्राम विकास


  • महाराष्ट्राचा समग्र भूगोल


  • अर्थव्यवस्था आणि धोरणे


  • पुरस्कार, सन्मान आणि नवीन प्रकाशित पुस्तके


  • महत्त्वाच्या नियुक्त्या आणि नेमणुका


 

४. ग्रामसेवक भरती (Gramsewak Bharti)


ग्रामसेवक पदाच्या अभ्यासामध्ये ग्रामीण विकास, पंचायत राज, कृषी, सामाजिक योजना, महिला व बालकल्याण, ग्रामीण अर्थव्यवस्था तसेच महाराष्ट्रातील सरकारी योजना यांच्याशी संबंधित चालू घडामोडी महत्त्वाच्या ठरू शकतात.


५. आरोग्य विभाग भरती (Aarogya Vibhag Bharti)


आरोग्य क्षेत्रातील खालील घटकांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे.


 

  • नवीन सरकारी आरोग्यविषयक योजना


  • सार्वजनिक आरोग्य अभियान, उपक्रम


  • रोग नियंत्रण आणि निवारण कार्यक्रम


  • विविध आरोग्यविषयक निर्देशांक


  • वैद्यक विज्ञान आणि तंत्रज्ञान


  • लसीकरण मोहिमा


  • जागतिक आरोग्य संघटनेशी (World Health Organization - WHO) संबंधित घडामोडी


  • विविध राष्ट्रीय आरोग्य धोरणे

 

६. महसूल विभाग भरती (Mahsul Vibhag Bharti)


महसूल विभागाशी संबंधित परीक्षांसाठी खालील घटकांचा अभ्यास महत्वाचा ठरतो:


  • महाराष्ट्र सरकार घोषित प्रशासकीय निर्णय


  • जमीन व महसूल प्रशासन निर्णय


  • ग्रामीण विकास आणि धोरणे


  • नैसर्गिक आपत्ती व निवारण कार्यक्रम


  • पीक व कृषी योजना आणि निर्णय


  • जिल्हानिहाय प्रशासन


  • सरकारी योजना


७. बँकिंग भरती (Banking Bharti)


Banking चालू घडामोडी हा स्वतंत्ररित्या वैशिष्ट्यपूर्ण आणि तितकाच अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे.


यामध्ये समाविष्ट घटक खालीलप्रमाणे:


  • भारतीय रिझर्व्ह बँक - Reserve Bank of India - RBI


  • रेपो दर (Repo Rate)


  • मौद्रिक धोरण (Monetary Policy)


  • बँकिंग नियमन(Banking Regulation)


  • डिजिटल बँकिंग (Digital Banking)


  • युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (Unified Payments Interface - UPI)


  • आर्थिक समावेशन (Financial Inclusion)


  • महागाई (Inflation)


  • सकल देशांतर्गत उत्पादन (Gross Domestic Product – GDP)


  • बँकिंग नियुक्त्या आणि नेमणुका (Banking Appointments)


  • विलीनीकरणे (Mergers)


  • भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ (Securities and Exchange Board of India - SEBI)


  • शेअर बाजार (Stock Market)


  • विमा (Insurance)


  • केंद्रीय आणि राज्य अर्थसंकल्प (Union and State Budgets)


  • आर्थिक पाहणी (Economic Survey)




पुढील लेखात आपण अजून सविस्तर माहिती घेऊया.


लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा - भाग २